वाई : पुणे – सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटात पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार व रविवार सलग सुट्टी असल्याने महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, कोल्हापूर, सांगली, कोकण, गोवा, कर्नाटककडे जाणारी वाहतुक वाढल्याने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांत नाराजी पसरली आहे. मागील महिन्यापासून या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

पुणे – सातारा महामार्गावर सध्या पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. सातारा – लोणंद रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने जड आणि मोठी वाहने राष्ट्रीय महामार्गाकडे वळवल्यामुळे खंबाटकी घाटात गाड्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे खंबाटकी घाटात वाहतुक कोंडी झाली आहे. वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील पूल पाडण्याचे काम सुरू केल्याने प्रशासनाकडून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचा ताण पुणे- बंगळुरु महामार्गावर आला आहे. शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर, कास पठार, कोल्हापूर, सांगली , गोवा, कर्नाटककडे जाणारे प्रवासी घाटात खोळंबले आहेत.

हेही वाचा : “…आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं”, जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट; म्हणाले, “..ते पाहाणं दु:खदायक होतं!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली आहे. खंडाळा पोलीस, भुईंज पोलीस, महामार्ग मदत केंद्राचे तसेच शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने बंद पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वाहतूक क्रेनच्या साहाय्याने दुप्पट दर आकारून रस्त्यात बंद पडलेली अवजड व हलकी वाहने बाजूला करून वाहन चालकांना मानसिक त्रास दिला जात आहे.