अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुंबई विभागात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल ९७.३५ टक्के लागला. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. तालुकानिहाय निकालाच्या टक्केवारीत म्हसळा तालुका अव्वल ठरला आहे.

   बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात रायगड मुंबई विभागात अव्वल ठरला आहे. ठाणे जिल्ह्याचा निकाल ९७.१३ टक्के, पालघरचा निकाल ९७.१७ टक्के, बृहन्मुंबईचा निकाल ९६.३० टक्के, मुंबई उपनगर १ चा निकाल ९६.७२ टक्के आणि मुंबई उपनगर २ चा निकाल ९६.६४ टक्के लागला आहे. तर रायगड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९७.३५ टक्के लागला आहे.  रायगड जिल्ह्यात  दहावीच्या परीक्षेसाठी ३५ हजार १९५ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. ३४ हजार ९९१  विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी ३४ हजार ०६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे ९७.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

   सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुली पास होण्याचे प्रमाण अधिक राहिले. ९८.१२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ९६.६५ टक्के मुले उत्तीर्ण झाली. १८ हजार ३७१ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १८ हजार २६२ मुले परीक्षेला बसली होती त्यातील १७ हजार ६५१ उत्तीर्ण झाली. तर १६ हजार ८२४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १६ हजार ७२९ मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी १६ हजार ४१६ मुली उत्तीर्ण झाल्या. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याचा निकाल ९९.०२ टक्के लागला, तर खालापूर तालुक्याचा सर्वात कमी ९४.४३ टक्के निकाल लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 तालुकानिहाय निकाल : पनवेल ९७.६१ टक्के, उरण ९७.३५ टक्के, कर्जत ९५.७८ टक्के,  खालापूर ९५.४० टक्के, सुधागड ९७.३९ टक्के,  पेण ९७.६४ टक्के, अलिबाग ९८.६९ टक्के, मुरुड ९४.४३ टक्के,  रोहा ९७.४१ टक्के,  माणगाव ९७.३६ टक्के, तळा ९७.४९ टक्के,  श्रीवर्धन ९८.११ टक्के, म्हसळा ९९.०२ टक्के, महाड ९८.६० टक्के, पोलादपूर ९७.१० टक्के. जिल्ह्याचा एकुण निकाल ९७.३५ गेल्या वर्षी लागलेला निकाल ९९.७३ टक्के निकालात २ टक्क्यांची घट