अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. यात तीन अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे. रायगड लोकसभा मतदार संघासाठी २८ उमेदवारांची ४० नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननी दरम्यान सात उमेदवारांचे अवैध ठरले. त्यामुळे २१ उमेदवारांची २८ नामनिर्देशनपत्र शिल्लक राहीली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ जणांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे अंतिमतः १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहेत.

हेही वाचा : सोलापुरात २१ तर माढ्यात ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी आस्वाद जयदास पाटील- शेकाप, सुनील दत्ताराम तटकरी, अभिजीत अजित कडवे, नंदकुमार गोपाळ रघुवीर, मिलिंद काशिनाथ कांबळे, विजय गोपाळ बना, गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, अस्मिता अश्विन उंदीरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे अनंत गिते(अपक्ष) अनंत बाळोजी गिते(अपक्ष) अनंत गंगाराम गिते(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), नितीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष), मंगेश पद्माकर कोळी(अपक्ष) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी) पांडूरंग दामोदर चौले (अपक्ष), सुनील दत्तात्रेय तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्रीनिवास सत्त्यनारायण मट्टरपती(अपक्ष), अजय यशवंत उपाध्ये(अपक्ष), अंजली अश्विन केळकर (अपक्ष), अमित श्रीपाल कडवे(अपक्ष), कुमूदिनी रविंद्र चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) असे तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. यात तीन अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे. गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले असले तरी, सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका उमेदवारानी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे.