अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १०७ बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील ७४ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या ७३ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी निगडीत आहेत. ही एक चिंताजनक बाब आहे.

महिलांवरील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. ते निंरतर वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि ठाणे सारख्या महानगरापासून अगदी लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातही याचीच प्रचिती येत आहे.

Rape victims appeal returned by thane legal services Authority demanding Rs 1 lakh from her
बलात्कार पीडित म्हणून मदत मिळविली ; मात्र कोर्टात साक्ष फिरविली, १ लाख रुपयांची मदत करावी लागणार परत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Bhiwandi 19 year old girl raped
१९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे चित्रीकरण केले समाज माध्यमांवर व्हायरल, एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
Frequent attacks on teams preventing illegal sand mining Threat to kill female Talathi
वाळू माफियावर महसूल प्रशासनाचा वचक नाही? अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या पथकांवर वारंवार हल्ले
Bombay high court on Badlapur sexual assault
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : महिला पोलीस अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई काय? उच्च न्यायालयाचा सवाल
Rwanda backed rebels enter in Congo city
आफ्रिकेत पुन्हा संहाराची चाहूल
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…

हेही वाचा…विधानसभा अपयशाने खचणार नाही ; उभारी घेऊ सतेज पाटील

सन २०१९- २० पर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे सरासरी वार्षिक ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी १०० गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉस्को अर्थात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

२०२४ मध्ये रायगड पोलीस दलाच्या हद्दीत बलात्काराची १०७ प्रकरणे, विनयभंगाची १५७ प्रकरणे दाखल झाली. बलात्काराची १०७ पैकी ७४ गुन्हे हे पॉस्को कायद्या अंतर्गतचे आहेत. म्हणजेच ही सर्व प्रकरणे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराशी निगडीत आहेत. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत एकूण २८ पोलीस ठाणे आहेत. यापैकी २४ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अलिबाग, कर्जत, खालापूर, रसायनी या शहरीभांगाप्रमाणे, पोलादपूर, महाड, म्हसळा, वडखळ आणि गोरेगाव सारख्या ग्रामीण भागातही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

बरेचदा आपली आणि कुटुंबाची बदनामी होईल या भितीने मुली समोर येऊन तक्रारी देत नाही. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा अत्याचाराचे प्रमाण जास्त असू शकते. महिला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे वाढलेले प्रमाण हे समाजातील वाढत्या विकृत मनोवृत्तीचे द्योतक आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. पोलीस कारवाई बरोबरच किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा…नांदणी मठाला तीर्थक्षेत्र दर्जा; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हा गंभीर विषय आहे. याबाबत कोणती ठोस पावले उचला येतील यासाठी, गृह विभाग आणि महिला आयोग यांच्याशी चर्चा करावी लागेल किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्याबाबत प्रयत्न करता येऊ शकतील.

आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री.

पूर्वी बदनामी होईल या भितीने पिडीत मुलगी अथवा तीचे पालक तक्रारीसाठी समोर येत नसत, आता जागृकता वाढल्याने, पिडीत मुली आणि तीचे पालक तक्रारीसाठी समोर येऊ लागले आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पण पोलीस अशा गुन्ह्याबाबत अतिशय संवेदनशील आहेत. वर्षभरात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आम्ही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली आहेत.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

रायगड जिल्ह्यात बलात्काराचे दाखल गुन्हे

२०१९ ४९

२०२० ५८

२०२१ ५७

२०२२ १०६

२०२३ १००

२०२४ १०७

Story img Loader