सांगली : सांगली बाजार समिती आवारात बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये चालू हंगामातील उच्चांकी ३७१ रुपये प्रति किलो भाव मिळाला. हा हिरवा बेदाणा विजयकुमार आमगोंडा पाटील यांच्या दुकानात भाग्यश्री एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला.

चालू वर्षी नवीन बेदाणा हंगाम लवकर सुरू झाला असून होळी व रमजान सणाच्या मुहूर्तावर बेदाणा खरेदीसाठी देशातील व्यापारी मोठ्या प्रमाणात सांगली मार्केट यार्डात दाखल झाले आहेत. बुधवारी पप्पू मजलेकर यांच्या दुकानात मल्लिकार्जुन सातलगाव (रा.कातराळ) यांच्या हिरव्या गोल बेदाण्यास चालू हंगामातील उच्चांकी असा ३७१ रुपये प्रति किलो दराने प्रवीण यादवाडे यांनी खरेदी केला. तसेच गुरुबसवेश्वर ट्रेडिंग यांच्या दुकानात चनबसू गुजरे( संख) या शेतकऱ्याच्या लांब सुटेखानी बेदाण्यास ३२१ रुपये प्रति किलो दराने भाग्यश्री एंटरपाईजेसने खरेदी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी सांगली सौद्यात रमजान व होळी सणाचे देशभरातील ग्राहक मोठ्या संख्येने दाखल झाले असून अनेक दुकानात नवीन मालाची मोठ्या प्रमाणात आवक होती. उत्तम प्रतीचा गोल व लांब सुटेखानी हिरवा बेदाणा उत्तर भारतामध्ये होळी व रमजान सणासाठी मोठ्या प्रमाणात विकला जातो. नवीन मालाचा अनेक दुकानात सौदा शुभारंभ बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील, काडाप्पा वारद, मनोज मालू, शेखर ठक्कर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी द्राक्षाला चांगला दर असून व द्राक्ष उत्पादन कमी असल्याने बेदाण्यालाही चांगलाच दर वर्षभर राहतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी नवीन बेदाणा सांगली मार्केटमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले.