सांगली : ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख शुद्ध ऊस रोपे उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती राजारामबापू कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी इस्लामपूर येथे दिली.

कारखान्याच्या वतीने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. श्री. पाटील म्हणाले, ‘कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना कमी दरात जैविक, सेंद्रिय खते, तसेच कमी दरात माती परीक्षण करून दिले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांनी खोडवा, नेडवा ऊस पीक घ्यावे. यामध्ये खर्चाची बचत होते. खोडवा पिकाचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळते. या वेळी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रारंभी संचालक शैलेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. युवराज पाटील (नाना) यांनी आभार मानले.