किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुपर मार्केटमधील वाइन विक्रीच्या निर्णयावर टीका केली आहे. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष आंदोलन करेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. दारू आणि वाइन ही एकच आहे. दोन्ही वेगवगळे असल्याचे चुकीचे म्हणाले आहेत, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपाने कडाडून विरोध केला आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र करायचं आहे का?, असा संतप्त सवाल भाजपाने केला आहे. त्यामध्ये आता केंद्रीय मंत्री रामदार आठलेंनीसुद्धा आपली भूमिका मांडली आहे.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Manoj Jarange patil,
“उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात…”, मनोज जरांगे यांचे आवाहन; म्हणाले, “मराठा समाजात…”
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

“किराणा दुकान, सुपरमार्केटमध्ये जर दारूचा आला माल, तर लोकांचे फार होणार आहेत हाल. सरकारची अत्यंत चुकीची आहे चाल, म्हणून भविष्यामध्ये या सरकारचे होणार आहेत हाल,” या कवितेच्या माध्यमातून रामदास आठवलेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

सुपरमार्केटमधून वाईन विक्री : भाजपाचा महाराष्ट्रात विरोध मात्र मध्य प्रदेशात घरातूनच मद्यविक्रीला परवानगी

दारू आणि वाइन एकच – रामदास आठवले</strong>

“दारू आणि वाइन एकच आहे. अजित पवार दारू आणि वाइन वेगळी आहे असे म्हणत आहे. दोन्ही एकच असल्याने असे ते म्हणता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

“शरद पवारांनी खूप सोसलंय त्यामुळे तरूण पिढीला नशेत..”; वाइन विक्रीवरुन भाजपा आमदाराची टीका

काय म्हणाले अजित पवार?

वाइनविक्रीच्या मुद्द्यावर सगळ्यांचा गैरसमज करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. “वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले.