राज्यभरात सोयाबीनला उच्चांकी भाव लातूरच्या बाजारपेठेत मिळाला. शनिवारी तब्बल ४ हजार ५३० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. राज्यातील बाजारपेठेच्या तुलनेत तब्बल २०० रुपयांनी भाव जास्त असल्यामुळे लातूर बाजारपेठेत सोयाबीनची विक्रमी आवक असल्याचे बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले.
लातूर बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेत आवक वाढली. शनिवारी १२ हजार क्विंटल आवक होऊन ४ हजार २०० ते ४ हजार ५३० रुपयांदरम्यान विक्रमी भाव राहिला. उदगीर बाजारपेठेत २ हजार क्विंटल आवक असून भाव ४ हजार २३० ते ४ हजार ३३० रुपये होता. अमरावती बाजारपेठेत ४ हजार क्विंटल आवक राहिली व भाव ३ हजार ९०० ते ४ हजार २०० रुपये क्विंटल होते. नागपूर बाजारपेठेत ८०० क्विंटल आवक व भाव ४ हजार ते ४ हजार ३२५ रुपयांपर्यंत राहिले. बार्शी बाजारपेठेत आवक २०० क्विंटल व भाव ४ हजार १०० ते ४ हजार १५० रुपये राहिले. जालना बाजारपेठेत आवक १५० क्विंटल राहिली व भाव ३ हजार ८०० ते ४ हजार १२५ रुपये होते. लातूर बाजारपेठेत सोयाबीनला विक्रमी भावाचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2014 रोजी प्रकाशित
सोयाबीनची विक्रमी आवक, लातूर बाजारात उच्चांकी भाव
राज्यभरात सोयाबीनला उच्चांकी भाव लातूरच्या बाजारपेठेत मिळाला. शनिवारी तब्बल ४ हजार ५३० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. राज्यातील बाजारपेठेच्या तुलनेत तब्बल २०० रुपयांनी भाव जास्त असल्यामुळे लातूर बाजारपेठेत सोयाबीनची विक्रमी आवक असल्याचे बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले.
First published on: 20-04-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record break inward of soybean in latur