वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त विधान केलं होते. यासंदर्भातला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – “राज्यपालांना वैचारिक पातळी नाही”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “जे लोकं…”

काय म्हणाले रोहित पवार?

“छत्रपती शिवाजी महाराजांवर आता सुधांशू त्रिवेदी हा भाजपाचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललं आहे. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी रोहित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!

“जे थोर व्यक्ती होऊ गेले सर्वांनीच सामान्या जनतेचे विषय ठिकाणी मांडले आहेत. त्यांची एक विचारसरणी आहे. त्या विचारणीत कुठंही भेदभाव नाही. हा विचार सत्तेत असणाऱ्यांना कदाचित पटत नाही. मग त्यांच्याबाबत चुकीचं बोलून त्यांच्या जागी दुसऱ्या विचारणीचे लोकं आणायचा प्रयत्न आहे का? याचा विचार करणेही महत्त्वाचं आहे”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवारांची राज्यपालांवरही टीका

यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरूनही टीका केली. “राज्यपालांनी पुन्हा एकदा त्यांची वैचारिक पातळी दाखवली आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. आम्ही त्या व्यक्तीकडे नाही, तर त्या पदाकडे बघतो. यापूर्वी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंबाबत बोलून त्यांनी त्यांची वैचारिक पातळी दाखवून दिली होती. त्यांनी तेव्हा धाडस कसं केलं? याच आश्चर्य आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलून पुन्हा एकदा त्यांनी हे धाडस केले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी केलेला वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यांना या महाराष्ट्रात राहण्याची गरज नाही, असं माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेच मत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.