वेदान्ता फॉक्सकॉनवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असताना याच मुद्दावर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी शनिवारी ( २४ सप्टेंबर ) रोजी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुण्याच्या वडगावमध्ये ‘जनआक्रोश’ मोर्चा काढला होता. या मोर्चासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपालाही टोला लगावला आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, “पुढचे दहा जन्म तुमची…”; सेनेकडून जशास तसं उत्तर

काय म्हणाले रोहित पवार?

“आदित्य ठाकरे वेदान्ताबाबत हे केवळ बोलत नाहीत, ते पुरावेही देत आहेत. ते पुरावे बघितल्यानंतर असं दिसते आहे की, राज्यातल्या बऱ्याच कंपन्या गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत. योगायोग म्हणजे, डिसेंबर महिन्यात गुजरातची निवडणूक आहे, त्यानंतर कर्नाटकची आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लोकांच्या हितासाठी सुरू आहे की राजकारणासाठी, असा प्रश्न पडतो. जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण आहे की, दुसऱ्या राज्याच्या हिताचं राजकारण, हे बघितलं पाहिजेत, खरं तर आदित्य ठाकरे हे लोकांत जाऊन वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – “माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवसेने नेत आदित्य ठाकरे यांनी शनिवारी ( २४ सप्टेंबर ) रोजी पुण्याच्या वडगावमध्ये ‘जनआक्रोश’ मोर्चा काढत वेदान्ता फॉक्सकॉनवरून शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. “राज्यातून अनेक प्रकल्प निघून जात आहेत. हे सत्य राज्यातील जनतेसमोर यावे यासाठी आजचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा जाहीर झाल्यानंतर राज्यभरातून लोक समर्थन देत आहेत. आज तळेगावात येताना मनात दुखं होते. आज महाविकास आघाडीचे सरकार असते. तर राज्यात वेदांन्ताचा प्रकल्प काहीही करून आणलाच असता. त्यामुळे आज इथे आक्रोश मोर्चाच्या जागी जल्लोष मोर्चा झाला असता”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारवर केली होती.