वाई: किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड मार्गे क्षेत्र महाबळेश्वर गडकोट मोहिमेला आज रायरेश्वर येथून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात झाली. या गडकोट मोहिमेत हजारो धारकरी सहभागी झाले आहेत. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची एकेचाळीसावी तर वाई तालुक्यातील यंदाची तिसरी पाच दिवसांची धारातीर्थ गडकोट मोहीम कडाक्याच्या थंडीत किल्ले रायरेश्वर येथून ध्वज निघताच सकाळी सहा वाजता सुरू झाली.

हेही वाचा >>> उजनी धरण पाच महिने अगोदर हिवाळ्यातच उणे पातळीत; उन्हाळ्यात पाण्याची भीषण परिस्थिती ओढवण्याची भीती

१९८३ साली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना करून समाज मनातून दुर्लक्षित झालेले छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, मावळे व गडकोट यांची महती युवा पिढीला व्हावी, गडकोटांचे संवर्धन व्हावे व सुदृढ समाज निर्मान व्हावा, यासाठी गडकोट मोहीम सुरू झाली. किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड (क्षेत्र महाबळेश्वरमार्गे) गडकोट मोहिमेत आज पहिला मुक्काम जोर (ता. वाई) येथे, दुसरा मुक्काम पोलो ग्राउंड मैदान महाबळेश्वर व तिसरा मुक्काम क्षेत्र पार (ता. महाबळेश्वर) येथे असून, समारोप २८ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी उदयनराजे भोसले व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेत भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन व पुढील वर्षातील उपक्रमाची माहिती व शिदोरी धारकऱ्यांना देतील. मोहिमेत वेगवेगळी धर्मगीते गात गात धारकरी चालत असतात.

महाराष्ट्रातून हजारो धारकरी या गडकोट मोहिमेत सहभागी झाले आहेत. विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातील नांदेड, गडचिरोली, जालना, संभाजीनगर, भुसावळ, परभणी, नागपूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातून हजारो धारकरी सामील झाले आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व राजस्थान येथूनही काही धारकरी सहभागी झाले आहेत. गडकोट मोहिमेचा पहिला मुक्काम जोर (ता. वाई) येथे सायंकाळी झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकोट मोहिमेत रायरेश्वर किल्ल्यावर जाताना  कोर्ले  (ता.भोर )गावाच्या हद्दीत पाय घसरून दरीत कोसळल्याने  सागर वानींगडे (हुपरी, कोल्हापूर) या  तरुण  धारकऱ्याचा  मृत्यू झाला.सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम भोरच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.