हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांवरून संभाजीराजे छत्रपती संतापले आहेत. चित्रपटातून इतिहासाची मोडतोड होत आहे. शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात येत आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “इतिहासाचे सिनेमा निघत असून, ही कौतुकाची बाब आहे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणे सोडले, तर इतिहासाच्या संदर्भात चित्रपट निघाले आहेत. ते चित्रपट इतिहासाची मोडतोड करुन काढले जात आहेत, ठिक आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबाबतच्या चित्रपटांबद्दल चालणार नाही,” असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

हेही वाचा : ‘हर हर महादेव,’ ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटांविरोधात रस्त्यावर उतरणार का? संभाजीराजे म्हणाले, “मी तर…”

“‘हर हर महादेव’ या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास करण्यात आला. हे असे चित्रपट लोकांच्या समोर घेऊन यायचं. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य घडवून दिलं. मात्र, आपल्याला चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे, म्हणून इतिहासाची मोडतोड करायची का?,” असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.

हेही वाचा : “लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार,” प्रकाश आंबेडकरांची टीका; नाना पटोले म्हणाले “भाजपाचे प्रवक्ते…”

तसेच, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. यात मावळ्याच्या भूमिका साकारत असलेल्या कलाकाराच्या पोशाखावर संभाजीराजेंनी आक्षेप घेतला. “इतिहासाचा गाभा धरून राहावा ना. यातील काही मावळ्यांनी पगडी घातली नसून, तो शोक संदेश आहे. जर, यापुढे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांनी असेच चित्रपट काढले तर, गाठ संभाजी छत्रपतीशी आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati angry har har mahadev film director ssa
First published on: 06-11-2022 at 16:21 IST