अवकाळी पावसाचं संकट आहे तेव्हा कृषीमंत्री हेलिकॉप्टरने का फिरत नाही? अवकाळी पाऊस आला म्हणून हे जाहीर करतो. दुष्काळ पडला ही मदत देतो हे धोरण मागची २५ वर्षे सुरू आहे. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? शेतकऱ्याला २४ तास लाईट बाकीची राज्यं देतात मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आङे.

आणखी काय म्हणाले संभाजीराजे?

“तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. शेतकऱ्यांना त्यांनी विविध योजना दिल्या आहेत. २४ तास वीज देत आहेत. मी ते समजून घेतलं आणि त्याचसाठी मी त्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांसाठी एक ठोस धोरण सरकारने हाती घेणं खूप आवश्यक आहे.स्वराज्य संघटना ही आम्ही राजकारणात उतरवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होतं तसं सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे” असंही संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे

गुढीपाडव्याच्या मी आज सगळ्यांना शुभेच्छा देतो तसंच माझी सरकारला विनंती आहे की आपला शेतकरी हा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. त्याला मदत करायला हवी. शेतकरी जगला तर आपण जगू हे विसरून चालणार नाही. उद्या दुष्काळ पडू शकतो अशीही चर्चा आहे. अशात शेतकऱ्यांसाठी एक दीर्घकालीन योजना आणली पाहिजे. सरकारने अशी योजना आणली तरच शेतकरी जगू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन धोरण सरकारने आखावं अशी माझी सरकारला विनंती आहे असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.