"कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना खुर्चीवर खाली खेचायचं आणि...", भुमरेंचे देशमुखांवर गंभीर आरोप | Sandeepan Bhumare allegations on MLA Prakash Deshmukh Uddhav Thackeray | Loksatta

“कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना खुर्चीवर खाली खेचायचं आणि…”, भुमरेंचे देशमुखांवर गंभीर आरोप

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर सुरतला जातानाचा किस्सा सांगितला आहे.

“कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना खुर्चीवर खाली खेचायचं आणि…”, भुमरेंचे देशमुखांवर गंभीर आरोप
संदीपन भुमरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर सुरतला जातानाचा किस्सा सांगितला आहे. तसेच बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी माझ्यासमोर एकनाथ शिंदे यांना सांगितलं, “मी देशमुख आहे, देशमुख कधी शब्द फिरवत नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना या खुर्चीवरून खाली खेचायचं आहे.” ते शनिवारी (२४ सप्टेंबर) अकोल्यात शिंदे गटाने आयोजित केलेल्या हिंदूगर्वगर्जना मेळाव्यात बोलत होते.

संदीपान भुमरे म्हणाले, मी कॅबिनेट मंत्री असताना एकनाथ शिंदेंसोबत गेलो. असं कधी घडत नाही, पण आम्ही कॅबिनेट मंत्री असो की राज्यमंत्री असो एकनाथ शिंदेंसोबत गेलो. ही देशातील पहिली घटना आहे. मुंबईतून सुरतला जाताना मी एकनाथ शिंदेंसोबत होतो. अब्दुल सत्तार आणि नितीन देशमुखही आमच्या सोबत होते. ठाण्याहून सुरतला जाताना आम्ही गाडीत बोलत होतो.”

“कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना या खुर्चीवरून खाली खेचायचं आणि…”

“तेव्हा अकोल्यातील आमदार नितीन देशमुख माझ्यासमोर एकनाथ शिंदेंना म्हणाले की, साहेब मी देशमुख आहे. देशमुख कधी शब्द फिरवत नाही. तुम्ही निर्णय घ्या, मी तुमच्या पाठिशी आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना या खुर्चीवरून खाली खेचायचं आहे आणि एकनाथ शिंदेंना खुर्चीवर बसवायचं आहे. ते हे बोलल्याचा मी स्वतः साक्षीदार आहे,” असं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.

“त्याचे मी आणि अब्दुल सत्तार साक्षीदार”

“आम्ही सुरतला गेल्यावर हॉटेलमध्ये थांबलो. त्यावेळी काय झालं मला सांगता येत नाही, पण नितीन देशमुखांचा निर्णय बदलला. त्याचे मी आणि अब्दुल सत्तार साक्षीदार आहोत. नितीन देशमुखांनी लोकांना सांगितलं की, मी गुवाहाटीवरून कसा आलो, एका ट्रकवाल्याने मला आणलं असं सांगितलं. आम्ही हे सर्व टेलिव्हिजनवर पाहिलं. मात्र, एकनाथ शिंदेंनी त्यांना स्वतः खासगी विमान करून दिलं.”

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे? वाचा…

“तेव्हा मी एकनाथ शिंदेंसोबत होतो. त्यांनी दोन माणसं देशमुखांसोबत पाठवली. तेव्हा देशमुख म्हटले की, मी घरी जाऊन एकदा घरच्यांना भेटून येतो,” असंही भुमरेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी

संबंधित बातम्या

“आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका
VIDEO : “तू तुझ्या औकातीत राहा, मला…”, ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात भर बैठकीत खडाजंगी
“युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी जो आमच्या कपाळावर …”; संजय राऊतांना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर!
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रेल्वे रुळांवर फेकलेले साहित्य गोळा करायला गेलेल्या भाजीविक्रेत्याला रेल्वेने दिली धडक, दोन्ही पाय निकामी
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!
“…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून संभाजीराजेंचा ‘झी स्टुडिओ’ला इशारा!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचा छत्रपती संभाजीराजेंच्या समाधिस्थानी आत्मक्लेश
Delhi Riots 2020 : दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता