सांगली : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेने पहिलवान चंद्रहार पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस सध्या वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

ठाकरे शिवसेनेने लोकसभेसाठी १६ जागांसाठी उमेदवारांची यादी बुधवारी सकाळी जाहीर केली. यानंतर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली असून माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. या नेत्यांची सायंकाळपर्यंत भेट झाली नसली तरी पक्षाचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांना भेटून सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क असून वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून काँग्रेससाठी ही जागा मिळवावी अशी विनंती करण्यात आली. दरम्यान, ताज्या घडामोडीबाबत विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता उबाठा शिवसेनेकडून सांगलीसाठी उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता वाटत होतीच. या घडामोडीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय आदेश मिळतो याकडे लक्ष आहे. पुढील काय भूमिका असेल हे आमचे नेते डॉ. कदम हेच जाहीर करतील असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अजून भरपूर कालावधी आहे. त्यामुळे घाई करण्यापेक्षा वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका सध्या घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन

हेही वाचा – राणा दाम्‍पत्‍याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्‍हान, भाजपमधूनही विरोध

हेही वाचा – नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

शिवसेनेने पैलवान पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांगलीत समाजमाध्यमावर मात्र, नो मशाल, ओन्ली विशाल हा संदेश वेगाने प्रसारित होत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने सांगलीच्या जागेसाठी जर ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे उमेदवार असतील तर त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.