सांगली : मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील एका हॉटेलवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी मध्यरात्री छापा टाकून ६० जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून २२ दुचाकी, चारचाकी वाहनेही पोलीसांनी ताब्यात घेतली असून पोलीसांच्या दोन विशेष पथकाने ही कारवाई केली.

म्हैसाळ रस्त्यावर हा जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती अधिक्षक संदीप घुगे यांना मिळाली. या माहितीनुसार त्यांनी दोन स्वतंत्र पथके नियुक्त करून कारवाईच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार बुधवारी मध्यरात्री पोलीसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांसह ६० जणांना ताब्यात घेतले. तसेच जुगार खेळण्यासाठी आलेल्यांच्या दुचाकी, रिक्षा व चारचाकी अशी २२ वाहनेही ताब्यात घेतली.