सांगली : जिल्ह्यातील तासगाव, पलूस, विटा या नगरपालिकेत महिलाराज असणार आहे. तासगाव, पलूसचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी तर विटा नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला गटासाठी आरक्षित आहे. जत, आष्टा नगरपालिका आणि कवठेमहांकाळ व शिराळा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी निश्चित करण्यात आले आहे.

थेट नगराध्यक्ष निवड होणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षांबरोबर कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले होते. आज नगरपालिका व नगरपंचायत अध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली.

इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. तर विटा नगराध्यक्षपद ओबीसी महिला गटासाठी निश्चित झाले. पलूस व तासगाव नगराध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित झालेे आहे. आष्टा व जत येथील नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी निश्चित करण्यात आले.

नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठीही आज आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये खानापूर व आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसींसाठी निश्चित झाले. तर कवठेमहांकाळ व शिराळा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण म्हणजेच खुल्या गटासाठी निश्चित झाले. थेट नगराध्यक्ष निवड होणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षांबरोबर कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले होते. आज नगरपालिका व नगरपंचायत अध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली.

पंचायत समिती सभापती आरक्षण शुक्रवारी

सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमधील सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता आरक्षण सोडत काढण्याचे निश्चित केले आहे. ज्या नागरिकांना सदर सभेस हजर राहायचे आहे, त्यांनी हजर राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धिपत्रकाद्वारे सोमवारी केले.

सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांमधील सभापती आरक्षण काढणे आवश्यक आहे. हे आरक्षण काढण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रवर्गासाठी, सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांची संख्या ठरवून दिली आहे. त्यानुसार आरक्षणाचा प्रवर्ग व संख्या पुढीलप्रमाणे – अनुसूचित जाती (महिला) – १, नागरिकांचा मागास प्रवर्ग – २, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – १, सर्वसाधारण – ३, सर्वसाधारण (महिला) – ३, एकूण संख्या १०