संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे पोपट, रवी राणांचा खोचक टोला

शिवसेनेचे २५ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचंही रवी राणा यांनी म्हटलं आहे

संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे पोपट आहेत असा खोचक टोला अपक्ष आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसात शिवसेनेने मुजोरी थांबवली नाही तर शिवसेनेचे किमान २५ आमदार मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील असाही विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. तसंच रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना रवी राणा यांनी शिवसेनेचे पोपट असं म्हटलं आहे. आता यावर संजय राऊत काही बोलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा- सत्तेचा निर्णय अधांतरी, तरी महापूजेचा मान भाजपालाच

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेने पाठिंबा दिल्याशिवय भाजपाचे सरकार येऊ शकणार नाही. अशात मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना अडून बसली आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद या शिवसेनेच्या दोन मागण्या आहेत. यावर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. याबाबत संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. अशात आता रवी राणा यांनी संजय राऊत यांना शिवसेनेचे पोपट असं म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut is shivsenas parrot says mla ravi rana scj

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या