संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत या दोघांनाही ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. आज सकाळी एका ट्वीटर हँडलवरुन शरद पवारांना तुमचा दाभोळकर करु म्हणून धमकी दिली गेली. त्यानंतर संजय राऊत यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणात नितेश राणेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत धमकी प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

काय म्हटलंय नितेश राणेंनी?

“संजय राजाराम राऊत आणि त्याच्या भावाला ठार मारण्याची धमकी आल्याचं मी ऐकलं. या प्रकरणात आदित्य ठाकरेची चौकशी झाली पाहिजे. कारण उबाठा शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे. उभा संघर्ष सुरु आहे. त्यामुळेच आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये संजय राऊतला वगळण्यात आलं आहे. उबाठा शिवसेना ही राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी संजय राऊत रात्रंदिवस प्रयत्न करतोय असं मी ऐकलं. तो विषय आदित्य ठाकरे ला मुळीच आवडलेला नाही. त्यामुळे मी वारंवार पत्रकार परिषदेत सांगतो आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात उभी फूट पडली आहे. ” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात फूट पडल्याचा नितेश राणेंचा दावा

यानंतर नितेश राणे म्हणाले, “माझी अपेक्षा आहे की संजय राऊतला आलेली धमकी आदित्य ठाकरेने दिलेली नाही ना याची चौकशी झाली पाहिजे. तुझ्या मालकाचा मुलगा तर तुझ्या मागे नाही ना? याची चौकशी संजय राऊतने करावी. तुला मिळालेली धमकी आदित्य ठाकरेने दिलेली नाही ना? याची चिंता आणि चौकशी संजय राऊतने करावी. मगाशी तो म्हणाला की स्टेट स्पॉन्सर्ड धमक्या आहेत. पण तुला मिळालेली धमकी उद्धव ठाकरे स्पॉन्सर्ड आहे का? याची चौकशी कर. तुला आवाज कुणाचा? यातून तुला का बाहेर काढलं आहे? संभाजी नगरमध्ये सभेला जाऊ नका असं आदित्य ठाकरेंना सांगण्यात आलं. त्यामुळे ही चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.