शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते-खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट या दोघांमधली खडाजंगी सुरूच आहे. संजय शिरसाटांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेत झालेल्या फुटीला संजय राऊत जबाबदार आहेत असं म्हटलं आहे. संजय शिरसाट म्हणाले, मातोश्रीबद्दलचा आदर संजय राऊतांनी घालवला आहे. पूर्वी नेते मातोश्रीवर यायचे, पण आता सिल्व्हर ओकवर जायची पाळी तुमच्यावर का आली? संजय राऊतांनी जनतेला सांगावं की, उद्धव ठाकरेंना घेऊन तुम्ही सिल्व्हर ओकवर का गेलात?

संजय शिरसाट म्हणाले, सिल्व्हर ओकवर तुम्ही जात आहात कारण तुम्हाला माहिती आहे, शरद पवारांची तेवढी ताकद आहे. तुमच्यावरील संकट ते निवारू शकतात हा विश्वास तुम्हाला आहे, म्हणून तिकडे जाता. संजय राऊतने पवारांच्या सांगण्यावरून ही फाटाफूट केली आहे. हे आमचं ठाम मत आहे. तरीसुद्धा हे लोक आम्हाला नितीमत्ता शिकवत आहेत. मुळात यांचा नेता कोण आहे हे यांनी सांगावं.

हे ही वाचा >> “महायुतीत विधानसभेच्या १५, लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या नाहीत तर…”, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ने दंड थोपटले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरसाट म्हणाले, या लोकांनी वज्रमूठ सभा सुरू केली. संभाजीनगरच्या सभेवेळी यांच्यासाठी (उद्धव ठाकरे) असलेली खास खुर्ची दुसऱ्या वज्रमूठ सभेवेळी बदलावी लागली. कारण जे नेते तुमच्या शेजारी बसलेले त्यांनी तुम्हाला तुमची लायकी दाखवून दिली. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे नाही हे दाखवून दिलं. आपण सगळेजण समान आहोत, त्यामुळे एका ओळीत बसलं पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. सभा घ्यायची असेल सर्वकाही समान असलं पाहिजे हे त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे तुम्ही त्यांचं ऐकलं. तेव्हा कुठे गेला होता तुमचा स्वाभिमान, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुठे गेले होते.