सातारा : राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ रुपयांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बँकेचे संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री व बँकेचे संचालक मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.

राज्यात उद्भवलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी बँकेने केलेली मदत ही मोठा हातभार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.अजित पवार म्हणाले, की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेली ही भरीव मदत आहे. पूर असो वा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मदतीसाठी सातारा जिल्हा बँक राज्यातच नव्हे, तर देशभरात आपल्या आदर्श कार्यप्रणालीसाठी ओळखली जाते. या वेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले मकरंद पाटील,डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.

बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील म्हणाले, ‘बँकेमार्फत रक्कम १ कोटी रुपये, तसेच बँक अधिकारी व सेवक यांच्या एक दिवसाची पगाराची रक्कम आणि संचालक यांचे एका सभा भत्त्याची अशी एकूण १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आली. सातारा जिल्हा बँक, बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात बँक नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे, तर देशामध्ये ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या त्या वेळी आर्थिक मदत केली आहे.

राज्यात उद्भवलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी बँकेने केलेली मदत ही मोठा हातभार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बँकेचे संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री व बँकेचे संचालक मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.