सातारा : सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील तेरावर्षीय शाळकरी मुलीच्या खून प्रकरणावरून गावात तणावाचे वातावरण झाले आहे. या मुलीच्या खूनप्रकरणी तिच्या घरालगतच्या एका तरुणाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती गावात जमलेल्या मोठ्या जमावाला समजताच या जमावाने संशयिताच्या घरावर हल्ला चढवला. खुनाच्या घटनेनंतर झालेल्या या हल्ल्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

सासपडे (ता सातारा) येथील तेरावर्षीय शाळकरी मुलीचा शुक्रवारी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडल्याचे मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले. संबंधित मुलीचा भाऊ घरी परतल्यानंतर तिच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. काल याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे गावातील वातावरण कालच तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी संबंधित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच, संतप्त जमावाने त्या तरुणाच्या घरावर हल्ला केला. याच वेळी गावात पोलीस दाखल झाल्याने अनर्थ टळला. संबंधित तरुणाने सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर यांनी दिली.

आरोपीला ताब्यात घेतल्याचे समजताच गावात संतापाची लाट उसळली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचेे जाहीर केले. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांची अतिरिक्त कुमक सासपडे गावात तैनात करण्यात आली आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आरोपीला कडक शासन करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

या घटनेमुळे गावातील वातावरण कालच तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी संबंधित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच, संतप्त जमावाने त्या तरुणाच्या घरावर हल्ला केला. याच वेळी गावात पोलीस दाखल झाल्याने अनर्थ टळला. संबंधित तरुणाने सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर यांनी दिली. खुनाच्या घटनेनंतर झालेल्या या हल्ल्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.