ज्येष्ठ अर्थतज्ञ, डॉ. जे. एफ. पाटील यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. अशक्तपणा आल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात चार दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

हेही वाचा- प्रशासनाची असंवेदनशीलता! न्याय मागणाऱ्या ‘त्या’ मृत दिव्यांग मुलांच्या वडिलांवरच केला गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण, अर्थशास्त्र, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात डॉ. जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख , इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष, भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांची मराठी, इंग्रजी भाषेतील अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.