अलिबाग : अल्पवयीन मुलिवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली एका ३५ वर्षीय आरोपीला येथील जिल्हा न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे . ज्ञानेश धनाजी ठाकूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की,पेण तालुक्यातील चोळे आणि दादर या ठिकाणी आरोपी ज्ञानेश ठाकूर याने २१ एप्रिल २०२१ ते ६ मे २०२१ या कालावधीत पीडित अल्पवयीन पीडित मुलीची फसवणूक केली. २१ एप्रिल रोजी तिला खाडी किनारी शेतात नेऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपण आता नवरा- बायको झालो असे सांगून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

हेही वाचा… अंधश्रद्धेची समृद्धी! महामृत्युंजय यंत्रप्रकरणी गुन्हा दाखल

त्यानंतर ५ मे २०२१ दादर येथे शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पीडित मुलीच्या काकीने नागोठणे पोलीस ठाण्यात आरोपी ज्ञानेश विरोधात फिर्याद दाखल केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख व त्यांचे सहकारी यांनी जलदगतीने तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले.

हेही वाचा… पुणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणास २० वर्षे सक्तमजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खटल्यात सरकारपक्षातर्फे ऍड. श्रीमती स्मिता धुमाळ- पाटील यांनी युक्तिवाद केला. आरोपी विरोधात सर्व साक्षी पुरावे सिद्ध झाल्याने भा द वी कलम ३७६, ३६३, ३७६ (२),(आय),(एन) तसेच पोस्को कायद्यांतर्गत आरोपी ज्ञानेश ठाकूर यास जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी दोषी ठरवून २० वर्षाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी,वैद्यकीय अधिकारी आणि तपासीक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली.