शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याला महाविकास आघाडीने हिरवा कंदिल दिला होता. याबाबतचा ठराव उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने मंजूर केला होता. पण अद्याप औरंगाबादचं नामकरण करण्यात आलं नाही.

याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. उत्तरेकडील अलाहाबाद शहराचं नामकरणं केलं जातं, पण औरंगाबादचं नामकरण केलं जात नाही. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं, ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. तरीही नामकरणाला विलंब लावला जात आहे, यावरून संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.

हेही वाचा- “किहोतो आणि रेबिया खटलाच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात गैरलागू”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान!

संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने अत्यंत घाईत प्रस्ताव मंजूर केला होता. आम्ही कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत बसणारा परिपूर्ण प्रस्ताव आणला. नामकरण करण्याची पुढील कार्यवाही केली जात आहे, अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाणार? राधाकृष्ण विखे-पाटलांची खुली ऑफर, चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, “औरंगाबादचं नामकरण आधी घाई घाईने झालं होतं. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने कायद्याचा अभ्यास न करता प्रस्ताव आणला होता. तो प्रस्ताव परिपूर्ण नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत तो निर्णय घेतला होता. त्यांनी अडीच वर्षात काही केलं नाही. अडीच वर्षे आम्ही पक्षाचे मंत्री होतो. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा, असं आम्ही मंत्रीमंडळ बैठकीत सांगत होतो. पण त्यांना अडचण होती. महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना घाईघाईत अपूर्ण प्रस्ताव आणला. पण आम्ही परिपूर्ण प्रस्ताव आणला. कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत तो ठराव मंजूर केला. आता औरंगाबादचं नामकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे.”