काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज (१४ मार्च) नाशिकमध्ये दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची चांदवड येथे सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य करत केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. तसेच देशात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांसाठी ७० हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. “आज शेतकरी संकटात आहे, पण या सरकारचे लक्ष नाही, हे सरकार शेतकरी विरोधी असून महागाई वाढविणारे आहे, त्यामुळे या सरकारला हटवणे हे तुमचे-आमचे काम आहे”, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार नेमके काय म्हणाले?

“राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. याला कारण फक्त देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते आहेत. शेती आणि शेतकरी यांच्याशी त्यांचा किंचितही संबंध नाही. मला आठवते डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो, तेव्हा एक दिवस याच चांदवडला माझी सभा होती. यावेळी दिल्लीला काद्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार होती. त्यामुळे मी सरळ दिल्लीला गेलो. तेव्हा आज जे सत्तेत आहेत, ते कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेच्या सभागृहात आले आणि कांद्यांचे भाव खूप वाढले आहेत, आम्हाला जगणे मुश्किल झाले आहे, अशा प्रकारच्या घोषणा देत होते.

BJP ignores the issues of inflation and unemployment Congress alleges in nashik
भाजपकडून महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांना बगल; काँग्रेसचा आरोप
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

माझ्या उत्तराच्या भाषणात मी त्यांना सांगितले की, कांदा हे जिरायत शेतकऱ्यांचे पीक आहे. कांद्याचे उत्पन्न आणि त्यावरील खर्च पाहिल्यांवर कांद्यांला जास्त किंमत द्यायलाच हवी. पण ही जास्त किंमत देऊ नये म्हणून भाजपाने कांद्याच्या माळा घातल्या होत्या. तेव्हा त्यांना सांगितले होते की, तुम्ही कांद्याच्या माळा घाला किंवा कवड्याच्या माळा घाला. कधी नाही ते शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत आहेत, त्यामुळे कांद्याच्या भावामध्ये अजिबात कपात करणार नाही”, अशी आठवण शरद पवार यांनी आजच्या सभेत सांगितली.

हेही वाचा : ‘जीएसटीमधून शेतकऱ्यांची सुटका करणार’, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधींचं आश्वासन

“एक निर्णय आणि ७० हजार कोटींचे कर्ज माफ”

“केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही आस्था नाही. याचा परिणाम संपूर्ण देशात झाला आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही तेथे गेलो, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पत्नीला विचारले, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? ती म्हणाली, ‘मुलीचे लग्न ठरले होते, बँकेचे कर्ज होते. सावकाराचे कर्ज होते. मुलीचे लग्न ठरल्यानंतर बँकेने नोटीस पाठवली आणि कर्ज फेडायला उशीर झाला म्हणून घरातील भांडी बाहेर काढली. त्यामुळे मुलीचे लग्न मोडले. ही परिस्थिती त्या मुलीच्या बापाला सहन झाली नाही. त्यामुळे आत्महत्या केली’. यानंतर आम्ही दिल्लीला गेलो, त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आणि ठरवले की शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे. त्यावेळी मत्रिमंडळात निर्णय घेतला आणि ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले”, असे शरद पवार म्हणाले.