रामदास कदम आणि मला आव्हान देण्यासाठी खेडच्या सभेचं ठिकाण निवडलं गेलं होतं. येथे कोणतीही ताकद उरलेली नसतात, उद्धव ठाकरेंनी वल्गना केल्या. खेडमध्ये सभा घेण्यासाठी पाच जिल्ह्यांतून माणसं जमवावी लागली. यातून खेड मतदारसंघात त्यांची ताकद नाही, हे सिद्ध झालं, अशी टीका शिवसेना ( शिंदे गट ) आमदार योगेश कदम यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना योगेश कदम म्हणाले, “मला संपवण्यासाठी अनिल परब यांना माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आलं. रत्नागिरीचे पालकमंत्री असताना सुद्धा अनिल परब तीन-चार दिवस फिरकले नाहीत. पण, नगरपंचायत निवडणुकीत मला संपण्यासाठी त्यांनी पाच ते सहा दिवस ठाण मांडलं होतं.”

हेही वाचा : अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य; महाविकास आघाडीला लक्ष्य करत म्हणाले…

“मी ज्या राष्ट्रवादीच्या आमदाराला पराभूत केलं, त्याला शिवसेनेत घेण्यासाठी २०१६ पासून प्रयत्न चालू होते. कदम कुटुंब राजकारणात जिवंत राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. उद्धव ठाकरेंची ही निती होती. त्यांच्या नितीमुळेच ते संपले आहेत,” असं टीकास्र योगेश कदम यांनी डागलं आहे.

हेही वाचा : “दिल्लीच्या ‘जी हुजुरी’मध्ये रमलेले…”, बोम्मईंच्या ‘त्या’ कृतीमुळे ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर घणाघात

सदानंद कदम यांना जेलमध्ये टाकण्यात रामदास कदम यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबद्दल विचारलं असता, योगेश कदमांनी सांगितलं, “याचा खुलासा दापोली तालुक्यातील रिझवान काझी देतील. अनिल परब आणि सदानंद कदम यांनी रिझवान काझींना बोलवून घेतलं होतं. तेव्हा वाळू व्यवसाय करणाऱ्यांकडून हफ्ते मागितले होते. हफ्ते देण्यास नकार दिल्याने, त्यांच्यावर कारवाया करण्यात आल्या. याच रागातून साई रिसॉर्ट प्रकरणाचे सर्व पुरावे रिझवान काझी यांनी किरीट सोमय्यांना दिले. यात रामदास कदम यांचा काही संबंध नाही,” असं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla yogesh kadam attacks uddhav thackeray over khed sabha eknath shinde ssa
First published on: 18-03-2023 at 15:46 IST