एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे (दि. १५ एप्रिल) घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना उबाठा गटावर धनुष्यबाणाच्या चिन्हावरून टीका केली. जे लोक ‘खान आणि बाण’ अशी टीका करत होते, त्यांचा बाण आता कुठे गेला? आता त्यांच्या गळ्यात साप आला आहे, असा आरोप ओवेसी यांनी केला होता. ओवेसींच्या या टीकेला विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “खान पाहीजे की बाण पाहीजे?”, या घोषणेतून आमचा खानाला नाही तर खान प्रवृत्तीला विरोध होता, असे दानवे यांनी स्पष्ट केले. आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे नाही. ओवेसी फक्त भाजपला मदत करतात, मुस्लिम बांधव आता सेनेसोबत आहेत म्हणून ओवेसींना पोटशूळ उठला आहे”, असेही दानवे म्हणाले.

खान अन् बाणाचे राजकारण आता संपले

शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी खान आणि बाणाचे राजकारण संपले, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, खैरे म्हणाले त्याप्रमाणे खान आणि बाण राजकारण संपले आहे. मुस्लिम समाज आता शिवसेना उबाठा गटाबरोबर आला आहे. आमचा खान प्रवृत्तीला विरोध आहे. खानाच्या नावावर देशविरोधी कृत्याला आमचा विरोध आहे. पण हिंदू आणि मुस्लीम दोघे गळ्यात घालून उद्धजींच्या नेतृत्वखाली काम करत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे.

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”

बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती घोषणा

बाळासाहेब ठाकरे यांनीच छत्रपती संभाजीनगरमध्ये खान पाहीजे की बाण पाहीजे? असा प्रश्न उपस्थित केला होता, असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. त्याव ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मुस्लिम समाजाचा शहरात धार्मिक उच्छाद होता. म्हणून बाळासाहेबांनी तो प्रश्न उपस्थित केला होता. हा उन्माद शिवसेनेने संपवला आहे.

“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता

आचारसंहितेचे नियम पंतप्रधानांही लागू पडतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असेल तर त्यात चुकीचे काही नाही. मागे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न झालेला आहे. निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना सारखेच असतात. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केल्यामुळे त्यांचा सहा वर्षांसाठी मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. रमेश प्रभू यांनी जिंकलेली निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द ठरविली होती. त्यामुळे पंतप्रधानांनाही हे नियम लागू केले पाहीजेत. अन्यथा निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पडणार नाहीत.