Maharashtra Breaking News Update : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. जागा वाटपातील तिढा सुटत नसल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत वाद होत आहेत. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील नेतृत्त्वांच्या नाकी नऊ येत आहेत. तर, काहींनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरून राजकीय इंगा दाखवला आहे. एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा असताना दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, रामदास तडस यांच्या सून पूजा तडसही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर महायुतीचा नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

Prashant Kishor on Yogendra Yadav
‘जिंकणार तर भाजपाच, काँग्रेसला किती जागा?’ योगेंद्र यादव यांच्या अंदाजानंतर प्रशांत किशोर यांचा टोला
yogi adityanath and narendra modi
“बुलडोझर कुठे चालवायचा हे योगींकडून शिका”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला
PM Modi Sabha
PM Modi Roadshow in Mumbai : “काँग्रेसने फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण केलं”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
yogendra yadav prediction on bjp
“भाजपाला २३३ तर एनडीएला…”, लोकसभा निवडणूक निकालांबाबत योगेंद्र यादव यांचं मोठं भाकित; Video मध्ये मांडलं जागांचं गणित!
Navneet Rana
“काँग्रेसला मतदान करणं म्हणजे…”, नवनीत राणांच्या वक्तव्यामुळे नवा वाद; गुन्हा दाखल
Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra News Today in Marathi
Lok Sabha Election 2024 : ब्रिजभूषण शरण सिंहांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
catchy slogans lok sabha election 2024, slogans in lok sabha election 2024
‘खासदार मंदिरवाला की दारुवाला हवा’, ‘रामकृष्ण हरी वाजवा….’; विरोधकांवर टीकेसाठी प्रचारात आकर्षक घोषवाक्ये
retired officers lok sabha election 2024, retired officer lok sabha marathi news
निवडणुकीत इच्छूक निवृत्त अधिकाऱ्यांच्या पदरी निराशा; अरुप पटनायक, लक्ष्मीनारायण अन्य राज्यांमध्ये रिंगणात
Live Updates

Marathi News Live Today, 16 April 2024 : महाराष्ट्रातील घडामोडी वाचा

19:53 (IST) 16 Apr 2024
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान

नाशिक : सोमवारी संध्याकाळी वादळी पावसामुळे आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वाचा सविस्तर...

19:52 (IST) 16 Apr 2024
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी

ठाणे : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याचे मंगळवारी दिसून आले. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले आमदार गायकवाड यांनी भाजपचे कार्यकर्ते श्रीकांत यांना साथ देतील अशी भूमिका मध्यंतरी घेतली होती.

वाचा सविस्तर...

18:49 (IST) 16 Apr 2024
गडचिरोलीत स्वत:हून ‘पोस्टिंग’ घेणाऱ्या बीडीओची ‘युपीएससीत’ही भरारी…..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःहून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सेवेची संधी मागितल्याने चर्चेत आलेले गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी युपीएससीतही यश संपादन केले आहे.

सविस्तर वाचा...

18:38 (IST) 16 Apr 2024
नवनीत राणा म्हणतात, “मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका, आपले जेवढे मतदार…”

जर कुणी फुग्‍यात राहत असेल, की मोदींची हवा आहे, तर तुम्‍ही लक्षात ठेवा मी २०१९ मध्‍ये अपक्ष म्‍हणून निवडून आली होती, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

18:21 (IST) 16 Apr 2024
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..

युद्ध क्षेत्राचा भास व्हावा अशी स्थिती सद्या गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

18:10 (IST) 16 Apr 2024
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 16 Apr 2024
माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल

सोलापूर : माढा लोकसभेसाठी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. याचवेळी त्यांचे चुलते, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पूरक अर्ज दाखल केला.

वाचा सविस्तर...

18:07 (IST) 16 Apr 2024
कल्याण-डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद

कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्ववाहिनी देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (ता.१८) रात्री १२ आणि शुक्रवारी (ता. १८) रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर, तळोजा औद्योगिक क्षेत्र, लगतच्या ग्रामपंचायंतींचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

वाचा सविस्तर...

18:07 (IST) 16 Apr 2024
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर

बदलापूरः राज्यासह ठाणे जिल्ह्यातही मंगळवारी उष्णतेची लाट जाणवली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाने सलग दुसऱ्या दिवशी चाळीशी ओलांडली होती. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

वाचा सविस्तर...

18:01 (IST) 16 Apr 2024
सत्तेचा गैरवापर! लालपरीवर महायुतीच्या जाहिराती, प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला…

निवडणूक आयोगाने प्रचार प्रसार करताना काटेकोर नियम घालून दिले आहेत. मात्र, एसटी महामंडळ अंतर्गत धावणाऱ्या बसेसवर चक्क महायुतीच्या जाहिराती झळकत आहेत.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 16 Apr 2024
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण

इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढण्याच्या भीतीने देशांतर्गत भांडवली बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. शिवाय परदेशी गुतंवणूकदारांकडून समभाग विक्रीचा ओघ सुरू असल्याने बाजारातील घसरण वाढली.

वाचा सविस्तर...

17:20 (IST) 16 Apr 2024
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानगी नाकारली होती.

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 16 Apr 2024
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक

मुंबई : वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. ते दोघेही मुळचे नेपाळमधील रहिवाशी असून क्षुल्लक वादातून ही हत्या झाली.

सविस्तर वाचा...

17:09 (IST) 16 Apr 2024
"उद्धव ठाकरे तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल तर....", आशिष शेलारांचं खुलं आव्हान

उद्धव ठाकरे हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्त्व करत असाल तर माझं जाहीर आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ४५ जागांच्या वर गेला तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल. आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, महाराष्ट्रात २०१९ मध्ये आमच्यामुळे १८ जागा जिंकलात. पण आता महाविकास आघाडीमुळे तुम्ही १८ जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन. उद्धवजींना हे खुलं आव्हान आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1780196766085947459

17:08 (IST) 16 Apr 2024
पोलिसांनी ‘हेल्मेट’पासून सुट दिली का? दुचाकीच्या प्रचार रॅलीतून चालकांचे ‘हेल्मेट’ बेपत्ता!

भाजप- काँग्रेससह इतरही उमेदवारांच्या समर्थकांकडून दुचाकी रॅलीही काढली जात आहे. या रॅलीत अनेक दुचाकी चालकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही.

सविस्तर वाचा...

17:07 (IST) 16 Apr 2024
“…तर सांगलीसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार आग्रही असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा...

16:58 (IST) 16 Apr 2024
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार आमदार प्रकाश आवाडे यांनी केला आणि तो ४ दिवसांतच हवेत विरलाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली शिष्टाई सफल ठरल्याने ज्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत होते त्या धैर्यशील माने यांच्या प्रचारात आवाडे सक्रियही झाले.

वाचा सविस्तर...

16:49 (IST) 16 Apr 2024
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू

नाशिक – न्हाणीघरात पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. चुंचाळे शिवारात ही घटना घडली. अल्तमश अन्सारी (फरगळे दवाखान्यासमोर, संजीवनगर) असे मुलीचे नाव आहे. अन्सारी कुटुंबीय सोमवारी सायंकाळी घरकामात गुंतले असताना हा अपघात घडला.

सविस्तर वाचा...

16:47 (IST) 16 Apr 2024
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”

अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले आहेत परंतु ते आज माझ्या विरोधात प्रचार करत आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

16:31 (IST) 16 Apr 2024
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट

नागपूर: लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरून निर्माण झालेला पेच व उमेदवार निवडीवरून नाराज भाजप नेत्यांना शांत करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानाहून करीत असल्याने नागपूर हे महायुतीसाठी ‘समजूत’ केंद्र ठरले आहे.

वाचा सविस्तर...

16:30 (IST) 16 Apr 2024
रावेर मतदारसंघात शरद पवार गट उमेदवार बदलणार ? संतोष चौधरी यांना अपेक्षा

जळगाव : पक्ष रावेर लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार बदलू शकतो. पक्ष आपल्याला उमेदवारी जाहीर करु शकतो, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केली आहे. उमेदवारी न मिळाल्यास २४ एप्रिल रोजी आपण उमेदवारी अर्ज भरणार, अशी घोषणा चौधरी यांनी केल्याने शरद पवार गटाला बंडाचा धोका निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा....

16:28 (IST) 16 Apr 2024
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी

यंदा नागपूरमधून चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 16 Apr 2024
अनंत गीते यांच्याकडे ८ कोटी १९ लाख ५९ हजारांची मालमत्ता

अलिबाग : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून इंडीया आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्याकडे ८ कोटी १९ लाख ५९ हजारांची मालमत्ता असल्याचे नमुद केले आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही.

वाचा सविस्तर...

16:05 (IST) 16 Apr 2024
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतांची आघाडी टिकवण्याचे भाजप-काँग्रेससमोर आव्हान

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपा समोर लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतांची आघाडी टिकवून ठेवण्याचे आवाहन आहे.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 16 Apr 2024
बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

मालेगाव : भरधाव जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसची राष्ट्रीय महामार्गावरील मुंगसे शिवारात दुचाकीला धडक बसल्याने आजोबा आणि नात यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरी नात गंभीर जखमी आहे. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने अडीच तासापेक्षा अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली.

सविस्तर वाचा...

15:53 (IST) 16 Apr 2024
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर, लातूर, उसमानाबाद : ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराचा भावनिक मुद्दा. दुसरा मुद्दा ‘मी कोणाचं वाईट केलं नाही’ आणि पुढे जात चंद्रकांत खैरे म्हणतात, ‘गेल्या वेळी चूक केली होती, ती आता पुन्हा करू नका’ या काही वाक्यांसह चंद्रकांत खैरे प्रचारात उतरले आहेत.

वाचा सविस्तर...

15:47 (IST) 16 Apr 2024
चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

शारदाचे वडील गजानन मादे्शवार यांच्याशी संपर्क साधला असता मुलगी देशात २८२ व्या रँकने उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. मुलगी आयएएस झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही असेही गजानन मादे्शवार म्हणाले.

सविस्तर वाचा...

15:36 (IST) 16 Apr 2024
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा

आज केंद्रीय सनदी सेवेचा निकाल लागला. त्यात येथील अभय डागा हा १८५ वी रँक घेऊन उत्तीर्ण झाला आहे.

सविस्तर वाचा...

15:35 (IST) 16 Apr 2024
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये नवरदेवाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लग्न सोहळ्यात शोककळा पसरली आहे. सुरज राजेंद्र रायकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

वाचा सविस्तर...

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह टुडे

Marathi News Live Today, 16 April 2024 : महाराष्ट्रातील घडामोडी वाचा