“ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशानं विचार करावा इतकं चांगले काम सुरू आहे. त्यामुळे कुणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला आवश्यकता नाही.” असं सांगत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हटले आहे. यावर बोलतना सामंत म्हणाले की, “टी रवी यांना आपण ओळखत नाहीत कधी निवडणुका घेतल्या तरी महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकणार. टी रवी यांची दखल घ्यावी असं मला वाटत नाही. अशा फुटकळ माणसांनी टीका केली, तर त्याला उत्तर काय द्याचं असं सांगत टी रवी यांच्यावर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बोलणं टाळलं.”

विकास कामांच्या निधीवरून माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, ”दिपक केसरकर हे मंत्री असताना २२५ कोटी रुपये या जिल्ह्याला मिळाले. पण त्यानंतर महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर अर्थमंत्र्यांनी असा निर्णय घेतला की लोकसंख्यानिहाय हे पैसे दिले जातील आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला दिले जातील. तशा पद्धतीने तो २२५ कोटींचा निधी १४३ कोटींवर आला. नंतर परत आज तो ३० कोटींनी वाढला असुन १७० कोटींवर गेला आहे. चांदा ते बांदा ही योजना जी बंद झाली होती, दिपक केसकरांच्याच पुढाकारातून आता याचं रुपांतर आता सिंधुरत्नमध्ये झालेलं आहे. तीन वर्षांत ३०० कोटी द्यायचा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे, त्याचे प्रस्ताव आता आम्ही पाठवत आहोत. ५० कोटी रुपये सिंधुदुर्ग आणि ५० कोटी रुपये रत्नागिरीला आलेले आहेत. त्यापेक्षा देखील अधिक निधी लागणार असेल तर महाराष्ट्र शासन तो द्यायला तयार आहे. महाराष्ट्र शासनाने १७० कोटींचा निधी जो जाहीर केला होता, सुरूवातील केवळ तो १० टक्के आला होता. आता संपूर्ण १७० कोटी रुपये आलेले आहेत.”