सातारा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा साताऱ्यात भोसले बंधुंमध्ये वाक्-युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केलेली असताना दुसरीकडे आता शिवेंद्रराजे यांनी देखील उदयनराजे भोसले यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. नगरपालिका निवडणुकीत या दोघांचे पॅनल असून त्यामुळे दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगल्याचं साताऱ्यातल्या दनतेला पाहायला मिळत आहे.

उदयनराजे भोसले यांनी नुकतीच शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. “त्यांच्या शरीराची वाढ झाली आहे, पण बुद्धीची वाढ झाली नाही”, अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केल्याचं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी आज पत्रकार परिषदमध्ये उदयनराजे भोसले यांची बुद्धी अचाट असल्याचा टोला लगावला आहे.

“तुमच्या बुद्धीचा हा कुठला पराक्रम!”

“ते म्हणाले की माझी वाढ झाली, पण बुद्धीची वाढ झाली नाही. खासदार साहेबांची बुद्धी वाढली असेल. त्यांची अफाट आणि अचाट बुद्धी आहे असं माझं म्हणणं आहे. त्याची तुलना आमच्याशी होऊच शकत नाही. आम्हालाही मान्य आहे की आम्ही लहान बुद्धीचे आहोत. पण यांच्या बुद्धीचे आविष्कार आणि पराक्रम बघितले, तर लोकांमधून निवडून आलेली लोकसभा घालवून हे आपली बुद्धी वापरून राज्यसभेत जाऊन बसले आहेत. म्हणजे जिथे तुम्ही पुढच्या दाराने गेले होते, ते सगळं घालवून मागच्या दाराने तुम्ही खासदार म्हणून बसलात. म्हणजे तुमच्या बुद्धीचा हा कुठला पराक्रम आहे हे तुम्हीच बघा”, असा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांच्या टीकेवर उदयनराजेंचे चोख प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोसले बंधूंमध्ये पुन्हा वाक्-युद्ध रंगलं!

“निवडणुका आल्या की नारळ फोडायचे, मंत्र्यांना निवेदनं द्यायची. ४-५ महिने मी नगरपालिकेत किती कामं करतोय हे दाखवायचं आणि लुटून खायचं हाच प्रकार सातारा विकास आघाडीचा लोकांना दिसलाय. खासदार साहेबांची बुद्धी एवढी मोठी आहे, तर साडेतीन वर्ष अजूनही भुयारी गटार योजना पूर्ण झालेली नाही. त्यांनी त्यांच्या अफाट बुद्धीचा वापर करावा. तीन वर्षांपासून घरकुल योजनेचं अजून कुठेच काही नाही”, अशा खोचक शब्दांत शिवेंद्रराजेंनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.