राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका दौऱ्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सावंत यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रचंड चेष्टा उडवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे. त्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- यंदा दसरा मेळावा शिवसेनेचा नसून शिंदे गटाचाच होणार? नरेश म्हस्केंचं मोठं विधान; म्हणाले, “कळेल तुम्हाला, मुख्यमंत्री…!”

नीलम गोऱ्हे यांना आदित्य ठाकरेंच्या पुणे दौऱ्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना गोऱ्हे यांनी सावंतांना खोचक टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा हा काही गुप्त नसेल. तसेच हा दौरा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर इतक्यापुरताच मर्यादित नसेल, असं म्हणतं नीलम गोऱ्हे यांनी तानाजी सावंतांना डिवचलं. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान संपन्न झाले. या अधिवेशनात विधान परिषद सभापती पद रिक्त असल्याने उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून काम पाहिले यात अधिवेशनातील कामगिरी तसेच माहिती देण्याबाबत गोऱ्हे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

कसा होता तानाजी सावंतांचा दौरा

अलीकडेच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता.. तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानुसार ते शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या कात्रजच्या निवासस्थानी पोहोचणार होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता ते कात्रज निवासस्थानाहून निघून बालाजी नगर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उपस्थित राहतील. तर ३ ते ५ या वेळेत बालाजी नगर येथील कार्यालयातून निघून कात्रज येथील कार्यालयात जातील. ५ ते ८ या वेळेत पुन्हा कात्रज कार्यालय ते बालाजी नगर कार्यालयात जातील. रात्री ८ वाजता बालाजी नगर कार्यालयातून निघून आपल्या कात्रज येथील निवासस्थानी जातील, या दौऱ्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर अशा दौऱ्याने तानाजी सावंत यांची चांगलीच खिल्ली उडवली गेली आहे.


तानाजी सावंतांचा दौरा वेळापत्रक

हेही वाचा- “शिवसेना आग आहे, नादी लागू नका, अन्यथा तुमची…”; दसरा मेळाव्यावरुन भास्कर जाधवांचा शिंदे गटाला इशारा

पुण्यात काडी टाकण्याचे प्रकार

अधिवेशनात पुण्याच्या प्रश्नाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, पुणे हे निराधार झालं आहे. आपले खासदार, पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विरोधक यांची जबाबदारी आहे की त्यांनी पुण्याचे प्रश्न एक संगत मांडले पाहिजे. सध्या पुणे शहरात प्रशासक राज्य सुरू आहे पण जेव्हा महापालिकेत सत्ता होती तेव्हा कोणालाच विचारात न घेता बैठका घेणे हा प्रकारच नव्हता. सध्या पुणे शहरात काडी टाकायचे प्रकार खूप झाले आहे. कोणीतरी भडकवायच आणि शांत बसायच, असं सुरू आहे. सध्या जातीच्या नावाने, कश्या न कश्या पद्धतीने माईंड गेम पुण्यात सुरू आहे. त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे की त्यांनी समन वयाने काम करावं. त्याचा उपयोग होईल असेही गोऱ्हे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader neelam gorhe criticize minister tanaji sawant over pune visit dpj
First published on: 28-08-2022 at 18:06 IST