आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. चकवा योग्य बसला तर अंगावर गुलाल पडतो. मात्र, चकवा हुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं, हे आमचं दु:ख आहे, असं विधान शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शहाजीबापू पाटील यांना तुम्ही खूप मोठं करून ठेवलं आहे. त्यांचं काय ते वाक्य, काय ते गाणं. ते निष्ठेचं वाक्य आहे का? सहा वेळा निवडणूक लढवून जिंकले नाही. शिवसेना चिन्ह पाठीमागे होते म्हणून निवडून आलेत. त्या शिवसेनेशी विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाच वर्षात नव्हे तर पुढील दोन वर्षात घरी आहोत, असं त्यांना म्हणायचं असेल,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी शहाजीबापू पाटील यांचा समाचार घेतला आहे. ते परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – “दिल्लीतील शहंशाह हीच खरी…”, भाजपाचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “राज्यात महाराजांच्या नावाने…”

“विश्वासघात करून त्यांना काही…”

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे देऊन लोक जमवल्याचा आरोप, मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर केला जात आहे. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, “भुमरेंना शिवसेनेने सहा वेळा उमेदवारी दिली. कॅबिनेट मंत्री केलं, तरीसुद्धा भुमरेंनी शिवसेनेला धोका दिला. विश्वासघात करून त्यांना काही मिळालं असेल, तर ते वाटत असतील. त्यामुळे ते अफवा असल्याचं कारण नाही, वस्तुस्थिती असेल,” असा टोला भास्कर जाधव यांनी भुमरेंना लगावला आहे.