Sanjay Gaikwad On Prataprao Jadhav : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला. विधानसभेत मिळालेल्या यशानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र, तरीही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यातच शिंदेंची शिवसेनेने गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी सुरु असतानाच शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्याला निवडणुकीत मदत केली नसल्याचा आरोप करत आमच्या पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, असं म्हटलं आहे. तसेच महायुतीमधील भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ऐन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असतानाच शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
mahayuti , Municipal Elections, leaders MNS ,
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत सामील व्हा, मनसेच्या बैठकीत प्रमुख नेते मंडळींचा सूर
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
jitendra Awhad Mahesh Vighne Walmik karad
Jitendra Awhad: ‘चौकशी करणारेच वाल्मिक कराडचे मित्र’, PSI बरोबरचे फोटो पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचे तपासावरच प्रश्नचिन्ह

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवार पक्षाला सावरू शकतील का? विधानसभेनंतर राष्ट्रवादीसमोर (शरद पवार) आव्हानांचा डोंगर

संजय गायकवाड काय म्हणाले?

“लोकांनी पैसा, दारू आणि मटण याला जास्त प्रधान्य दिलं. महाराष्ट्रात एवढी विकासकामे नाहीत तेवढी विकास कामे बुलढाण्यात झाली आहेत. अनेकजण म्हणायचे की एवढे कामं करणारा आमदार आम्ही पाहिला नाही. मात्र, अचानक पैशाचा खेळ एवढा मोठा झाला की विरोधकांकडून ६० ते ७० कोटी रुपये वाटले गेले आणि मला निवडणूक जड गेली. मात्र, शेवटी विजय हा विजय असतो. जो जीता वही सिकंदर, मग निसटता का होईना पण विजय झाला. महाराष्ट्रात असं अनेक ठिकाणी झालं अनेकांचा विजय शंभर ते दोनशे मतांनी झाला. शेवटी विजय होणं महत्वाचं असतं”, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं.

संजय गायकवाडांचा मंत्री जाधवांवर गंभीर आरोप

तसेच संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावरील आरोपावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, “आरोप नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे. बुलढाण्यात शिवसेनेकडून (ठाकरे) रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता. मात्र, अचानक आमच्या खासदारांचा (प्रतापराव जाधव) मिलिंद नार्वेकरांना फोन गेला आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. त्यानंतर संजय कुटे हे अनिल परब यांना फोन करतात आणि हे दोघेही सांगतात की उमेदवार बदलून द्या. जयश्री शेळकेंना उमेदवारी दिली तर आम्ही मदत करू. त्यानंतर तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला गेला”, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.

गायकवाड पुढे म्हणाले, “मला असं म्हणायचं आहे की आमच्या खासदारांनी आणि आमच्या संपर्क नेत्यांनी असं का वागावं? तसेच भाजपा महायुतीतील आमदारांनी असं का वागावं? संजय कुटेंच्या घरी जयश्री शेळके यांची बैठक झाली, माझ्याकडे सर्व रिपोर्ट आहेत. भाजपाचा एकही कार्यकर्ता आमच्या बरोबर फिरला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक तर आमच्या विरोधात काम करत होते. त्यामुळे ही लढाई आम्हाला एकट्यालाच लढावी लागली आणि जिंकली देखील. तिकीटच बदललं त्यामुळे काम करण्याचा प्रश्नच कुठे येतो? त्यांना मी (प्रतापराव जाधवांना) नकोच होतो. त्यांनी एकाही व्यक्तीला सांगितलं नाही की मला मतदान करा”, असं आरोप संजय गायकवाड यांनी केला. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Story img Loader