संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार बाहेर पडले आहेत. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही अशा शब्दात शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी टीका केली आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींनंतर शंभूराजे देसाई आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार बोलतात ते कधीच खरं ठरत नाही असंही ते म्हणाले.

“संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना महत्त्व देत नाही. शरद पवार जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असं सांगितलं होतं, पण अडीच वर्षात हे सरकार गेलं. आता शरद पवार म्हणत आहेत मध्यावधी लागणार, पण तसं होणार नाही,” असं शंभूराजे देसाई म्हणाले आहेत.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

प्रत्येक आमदाराला ५० कोटी दिल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी पुरावा आहे का? अशी विचारणा केली. पैसे घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन असंही ते म्हणाले. आम्ही शिवसेनेत आहोत, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंची शिवसेना पुढे घेऊन आम्ही चाललो आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

डोंबिवली, कल्याणमध्ये शिवसेना-भाजप-मनसेचा समेट; भाजपच्या कोट्यातून मनसे आमदार प्रमोद पाटील यांना मंत्रिपद?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मैदान आता जास्त दूर नाही. अडीच वर्षानंतर निवडणुका होतील तेव्हा परिस्थिती समोर येईल. आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही असा शब्द दिला असून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे,” असं शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.