शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. शरद पवारांनी जादूटोणा केल्याने उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेससह गेले असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंच्या या टीकेला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“जयंत पाटील यांनी सत्तेचं स्वप्न पाहणं सोडून दिलं पाहिजे. आजही ते स्वप्नात असतील, त्यांना सत्ता गेल्यासारखं वाटत नाही आहे. बेईमानी करत त्यांनी यशस्वीपणे सरकार स्थापन केलं होतं. एकाप्रकारे उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केल्यासारखा प्रकार झाला. त्या जादूटोण्यात उद्धव ठाकरे फसले. खासकरुन राष्ट्रवादीनेच उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं मन वळलं आणि दरवाजे बंद करुन शरद पवारांकडे गेले. पण आता आम्ही फार जागरुक आहोत, शिंदे-फडणवीस सरकार २०० हून अधिक जागा आणणार आहे,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका; म्हणाले, “आता सत्तेत…”

दरम्यान, जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोण? असे विचारले असता, “ते भोंदूबाबा कोण, हे पूर्ण देशाला आणि राज्याला माहिती आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर

“भाजपाचे नेते एका बाजूला कटुता संपली पाहिजे, द्वेष संपवला पाहिजे असं सांगत समजंसपणाचा आव आणतात, पण दुसरीकडे त्यांचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांबद्दल असं विधान करतात. यातून त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हाच फॉर्म्यूला असल्याचं दिसत आहे. एका बाजूला कटुता, द्वेष संपवूया म्हणायचं आणि दुसरीकडे द्वेषाला खतपाणी घालणारी वक्तव्यं करायची ही भाजपाची जुनी खोडच आहे,” अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.