शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली असून गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं आहे. मातोश्रीबाहेर जळगाव आणि वाशीममधील शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधताना नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच अशा शब्दांत टीका केली. आपण सर्वांनी प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं, पण औलाद गद्दारच राहिली असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.

“आपण सर्वांनी प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं, पण औलाद गद्दारच राहिली. नागाला कितीही दूध पाजलं, तरी चावायचं तो चावतोच,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“वाशीममध्ये भांडणं मिटवता मिटवता आपल्या नाकी नऊ आले होते, तरी आपण त्यांना सांभाळलं होतं. आपण त्यांना सगळं काही दिलं होतं. जळगावमध्ये भाजपाने गुलाब पाहिला, पण आता सैनिकाचे काटे पाहायचे आहेत. एक गुलाब गेला पण दुसरे गुलाबराव वाघ आपल्यासोबत आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’बाहेर साधला संवाद, शिवसैनिकांना म्हणाले “अनेक आव्हानं…”

“दोन ते तीन पातळ्यांवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde in SC: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर, आजचा युक्तिवाद संपला, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

“आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका केली. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा डाव आखला जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रीम कोर्टात काय झालं?

राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत उद्या म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली.