scorecardresearch

Premium

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा प्रशासनाकडून सोलापूर प्रशासनाकडे, साताऱ्याकडून निरोप

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा साताऱ्यातील पाच दिवसांचा प्रवास आटोपून सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हरी नामाचा गजर करीत हस्तांतरीत करण्यात आला.

Shri Dnyaneshwar Maharaj palanquin
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा प्रशासनाकडून सोलापूर प्रशासनाकडे, साताऱ्याकडून निरोप (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

बरड : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा साताऱ्यातील पाच दिवसांचा प्रवास आटोपून सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हरी नामाचा गजर करीत हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी सातारा व सोलापूर हद्दीवर वारकरी भाविकांनी माउली माउलीचा गजर केला. यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी राजुरीपासून ते सोलापूर जिल्ह्यच्या सीमेपर्यंत माउलींच्या रथाचे सारथ्य केले.

सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आज धर्मपुरी (जि. सोलापूर) येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत केली. यावेळी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

sudhir manguttiwar
छत्रपतींच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून घोषित; सुधीर मुनगंटीवार यांची आग्रा किल्ल्यावरून घोषणा
Kolhapur, Chhatrapati Shivaji Maharaj, shivjayanti, Grand Celebration, Naval Decorations, Maratha Swarajya, Bondre Nagar,
कोल्हापुरात शिवजयंती उत्साहात; बोंद्रेनगरातील मराठा स्वराज्याचे आरमार आकर्षण
Ajit Pawar Faction reply on Yogi Adityanath
‘योगी आदित्यनाथ यांचा अभ्यास कमी’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून अजित पवार गटाची टीका
rs 100 for per tonne of sugarcane to pay immediately to farmers demand by swabhimani shetkari saghtana
कोल्हापूर: ऊसाला प्रति टन १०० रुपये द्या अन्यथा साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकणार; ‘स्वाभिमानी’चा इशारा

हेही वाचा – तलाठी पदाच्या ४६४४ पदांची जाहिरात आली, जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप व इतर माहिती

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखीने १८ ते २३ जून दरम्यान साताऱ्यातील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करून धर्मपुरी येथून आज सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान केले. तरडगाव येथे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण झाले. तत्पूर्वी साताऱ्यात प्रवेशावेळी माउलींच्या पादुकांना पहिले नीरा स्नान झाले.

हेही वाचा – “अजितदादांना पक्षाची जबाबदारी मिळेल, असं वाटत नाही”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, “त्यांच्याविरोधात…”

माउलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी खूप चांगले काम केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य व सोयी – सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. यावेळी श्रीमंत उर्जितसिंग शितोळे सरकार पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर, बाळासाहेब चोपदार, विश्वस्त योगेश देसाई सुधीर पिंगळे, आळंदी देवस्थान ट्रस्टचे ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shri dnyaneshwar maharaj palanquin transferred from satara administration to solapur administration ssb

First published on: 23-06-2023 at 17:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×