scorecardresearch

‘खोके, खंजीर, धोका एवढंच त्यांना बोलता येतं’; श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा

श्रीकांत शिंदे म्हणाले, आम्ही आमची कामे पक्ष नेतृत्वाकडे घेऊन गेल्यावर घेऊन गेल्यावरही आम्हाला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उठावे केला

‘खोके, खंजीर, धोका एवढंच त्यांना बोलता येतं’; श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा
श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा

सकाळी उठल की एक भोंगा सुरू होतो. तेच तेच बोलायच. खोके, खंजीर, धोका एवढंच बोलतात. आधी खोके कोणाकडे जात होते कुठे जात होते. कोण मोजायचे, त्यामुळे त्यांना नुसते खोके खोके आठवतात. पण आता परत कधीच खोके सुरु होणार नाहीत. हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आपले मुख्यमंत्री असल्या टिकेला भीक न घालता कामातून उत्तर देत असल्याचेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा- ‘तात्या कधी येता, वाट पाहतोय’; अजित पवारांचा मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पुण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रतोद भरत गोगावले, प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहर प्रमुख नाना भानगीरे उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ घोषणा झाल्या. पण कोणत्याही प्रकारची काम झाली नाही. आम्ही आमची कामे पक्ष नेतृत्वाकडे घेऊन गेल्यावर आम्हाला वेळ दिला जात नव्हता. या गोष्टी सतत होऊ लागल्याने अखेर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ५० आमदार आणि १३ खासदारांना उठाव करावा लागला. त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होऊन जवळपास चार महिन्याचा काळ लोटला. त्या दरम्यान राज्यातील अनेक भागातील आमदार, खासदार सर्व सामान्य नागरिक मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी येऊन भेटत आहे. याच वर्षा निवासस्थानाची दारं आमदार, खासदाराना बंद होती. तेच दार सर्वासाठी खुली झाल्याने सर्वजण आनंदी असून अनेकांची काम होत आहेत.त्याचा आम्हाला आनंद असून येत्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर काम केली जाणार असल्याचेही श्रीकांत शिंदे म्हणाले.

हेही वाचा- महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढली! कर्नाटकनंतर आता नाशिकमधील गावं गुजरातमध्ये विलीन करण्याची मागणी

पहिला मुख्यमंत्री असेल ज्याने दिवाळी शेतकऱ्यांसोबत करायचे ठरवले आणि वर्षा बंगल्यावर दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी केली.अगोदरच सरकार फक्त घोषणा केल्या.आपले सरकार घोषणा करत नसून काम करून दाखवतात असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच ते पुढे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून तो प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पण हा प्रकल्प करताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या.त्या सर्व शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याच काम केल्याने शेतकरी आनंदित असल्याचे त्यांनी सांगितले. मी पुण्यात पहिल्यांदाच आलो असून लाल महालात जाऊन जिजाऊचा दर्शन घेतलं.तेथील नागरिकांनी काही समस्या सांगितल्या आहेत. तेथील प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 21:05 IST

संबंधित बातम्या