राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतात. तीन दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्वीट करत नवाब मलिक आणि नाना पटोलेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अमृता या पातळी सोडून बोलत असल्याची टीका देखील त्यांच्यावर झाली. नाना पटोले यांनी त्यांच्या टीकेवर उत्तर देताना त्या आमच्या सूनबाई असल्याचं म्हटलं होतं. अशातच मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देत टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर भाजपा आमदार श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“वहिनी स्वतःला आवरा, जर भाऊ तुम्हाला…”; अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रुपाली पाटलांनी सुनावलं

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया

श्वेता महाले म्हणाल्या, “परवा राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रुपाली-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची वैचारिक पातळी काय आहे हे दिसून येते. रुपाली पाटील स्वतः महिला आहेत आणि एका महिलेबद्दल असे बोलतात आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवतात.  देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीसांना आवरण्यापेक्षा पेक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांच्याच पक्षातील मंत्री धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांना आवरलं तर बरं होईल,” अशी प्रतिक्रिया श्वेता महाले यांनी दिली.

काय म्हणाल्या होत्या रुपाली पाटील…

“वहिनी स्वतःला आवरा. जर भाऊ तुम्हाला आवरू शकत नसतील तर तुम्हीच स्वतःला आवरा. अन्यथा मानसिक संतुलन बिघडल्यास तुम्हाला उपचार घ्यावे लागतील. देवेंद्र फडणवीसांची नावडती बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्वत:ला आवरा,” असं रुपाली पाटील अमृता फडणवीसांना म्हणाल्या होत्या.