आंबा, काजू पिकाने धोका दिला तरी कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही. हा शेतकरी आशावादी असून, शेती संशोधक वृत्तीने करीत असतो, असे सिंधुदुर्ग ऑरगेनिक फेडरेशनचे बाळासाहेब परुळेकर यांनी सांगून बारमाही पीक देणाऱ्या नारळाचे उत्पादन वाढवा. त्यासाठी न्यू प्राइम अ‍ॅग्रिकल्चर संस्थेने मार्केटिंगची हमी भावाने जबाबदारी घेतली आहे, असे सांगितले. न्यू प्राइम अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड मार्केटिंग मल्टिस्टेट को ऑफ सोसायटी आणि सिंधुदुर्ग डिस्टिकल ऑरगेनिज फॉर्मरस फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने नारळ व्यवस्थापक व शेतीविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत बाळासाहेब परुळेकर बोलत होते. या वेळी ऑरगेनिकचे सचिव रामानंद शिरोडकर, कृषी अधिकारी काका परब, फळ संशोधनाचे प्रा. महेश शेडगे, डॉ. संतोष वानखेडे (मुळदे), खजिनदार रणजीत सावंत उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वेळी बाळासाहेब परुळेकर म्हणाले, न्यू प्राइम अ‍ॅग्रिकल्चरचे चेअरमन आदेश (आदिनाथ) येरम यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास बाजारभाव मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. सिंधुदुर्गचा नारळ मुंबईत नेऊन विक्री सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे ६० हजार नारळ हमीभावाने घेऊन मुंबईत विक्री केली आहे. त्याशिवाय आंबा, काजू, कोकमवरदेखील प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला मुंबई बाजारपेठेत मार्केटिंगची संधी निर्माण केली असल्याने शेतकऱ्याला ही सुवर्णसंधी निर्माण झाल्याचे बाळासाहेब परुळेकर म्हणाले. नारळाला हमीभाव न्यू प्राइम अ‍ॅग्रिकल्चरचे चेअरमन आदेश येरम यांनी दिला आहे. आता नारळावर प्रक्रिया उद्योग उभे राहतील. सेंद्रीय शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन बाळासाहेब परुळेकर यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg coconut getting good rate
First published on: 31-05-2016 at 02:09 IST