सोलापूर : करमाळा तालुक्यातील वढशिवणे गावच्या शिवारात मध्यरात्री एका शेतघरात घुसून चार चोरट्यांनी वृद्ध शेतकरी दाम्पत्यावर चाकूहल्ला करून त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून चार लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने लुटून नेला. या गुन्ह्याची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत शकील कांतिलाल मणेरी (वय २६, रा. पांगरी, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरटे वयाने पस्तिशीतील होते. शकील मणेरी यांचे वृद्ध आई-वडील वडशिवणे गावच्या शिवारात स्वतःच्या शेतात राहतात. नेहमीप्रमाणे शेतघरात रात्री जेवण आटोपून आणि गप्पा मारून दोघेही झोपी गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यरात्री दोनच्या सुमारास चौघा चोरट्यांनी तेथे घुसून घराचा पत्र्याचा दरवाजा तोडला. चोरट्यांनी शकील मणेरी यांच्या आईवर चाकूने हल्ला करून दहशत निर्माण केली. त्यांचे वडील कांतिलाल मणेरी यांनाही बेदम मारहाण केली. त्यांना धमकावून त्यांच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटात ठेवलेली तीन लाख ४४ हजारांची रोकड बळजबरीने लुटून नेली.