मराठवाड्यात दारु कंपन्यांना दिले जाणारे पाणी तात्काळ बंद करा, असा आक्रमक पवित्रा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा, असे उद्धव यांनी सांगितले. सरकारला दारूतून मिळणाऱ्या महसुलाची चिंता पडली असेल तर महसूल इतर गोष्टींतून मिळवता येऊ, शकेल असे उद्धव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop providing water to beer companies and liquer processing plant in marathwada says uddhav thackeray
First published on: 16-04-2016 at 15:35 IST