scorecardresearch

बीड जिल्ह्यात छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल

(संग्रहीत छायाचित्र)

रस्त्यावर फिरणाऱ्या रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पट्टीवडगाव ( ता. अंबाजोगाई ) येथील घटनेनंतर मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित रोड रोमिओवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव येथे मंगळवार (१० मे) रोजी, एका विद्यार्थीनीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. तिचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत. या घटनेंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसाररून मागील काही दिवसांपासून अकबर शेख हा तरुण संगणक शिकवणीला जात असलेल्या या विद्यार्थीनीची छेड काढत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलून तो तिला त्रास देत होता. याबाबत मुलीने आईला सांगितले होते. यानंतर शुक्रवार(६ मे) रोजी मुलीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेतले आणि तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु, त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे मुलीच्या आईला सांगितले होते. शिवाय, वडील आणि भाऊ आल्यावर आपण मार्ग काढूत अशी आईने तिची समजूत घातली होती.

मात्र, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या या विद्यार्थीनीने मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असताना घरात साडीने गळफास घेतला. रात्री उशिरा आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांच्या मदतीने तिला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून अकबर शेख याच्यावर बर्दापूर ( ता. अंबाजोगाई ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Student commits suicide in beed district msr

ताज्या बातम्या