मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळत ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा घेण्यासाठी परवानगी दिली. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. आता वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “नेहमीच न्यायालयावर संशय व्यक्त करणाऱ्या नेत्यांचा या निकालामुळे न्यायालयावरील संशय वाढेल,” असा खोचक टोला मुनगंटीवारांनी लगावला. ते शनिवारी (२४ सप्टेंबर) चंद्रपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “नेहमीच न्यायालयावर संशय व्यक्त करणाऱ्या नेत्यांचा या निकालातून न्यायालयावरील विश्वास वाढेल, अशी अपेक्षा करणं योग्य होईल. न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने तर्कसंगत युक्तिवाद ऐकून मेरिटवर निर्णय दिला.”

“न्यायालयाविषयी नेहमी संशय व्यक्त करणाऱ्यांच्या मनात यातून न्यायव्यवस्थेबद्दलचा विश्वास वाढेल,” असं म्हणत मुनगंटीवारांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला.

हेही वाचा : ‘अल-कायदाप्रमाणे ऑपरेशन कमळची भीती’: ‘सामना’तील टीकेवर मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले, “ते वर्तमानपत्र…”

“न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन होईल”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस या निकालावर बोलताना म्हणाले होते, “न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रशासन काम करेल. न्यायालयात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने भूमिका मांडली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येईल. कोणी नियमांचे उल्लंघन करु नये यासाठी गृहविभाग काळजी घेईल.”

“शुभेच्छा आहेत”

उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबात शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यानंतर येणाऱ्या अनेक न्यायालयीन लढाई जिंकल्या जातील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर ‘शुभेच्छा आहेत’ या दोनच शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar comment on decision of mumbai high court on shivsena dasara melava pbs
First published on: 24-09-2022 at 14:20 IST