‘गुडेवारांच्या बदलीप्रकरणी सुशीलकुमारांनी खुलासा करावा’

सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अवघ्या अकरा महिन्यांत राजकीय हितसंबंधातून झालेली बदली अचानक कशी झाली, याचा खुलासा करण्याची मागणी चंदनशिवे यांनी शिंदे यांच्याकडे केली.

सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अवघ्या अकरा महिन्यांत राजकीय हितसंबंधातून झालेली बदली रद्द व्हावी म्हणून बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गुडेवार यांची बदली अचानक कशी झाली, याचा खुलासा करण्याची मागणीही चंदनशिवे यांनी शिंदे यांच्याकडे केली.
शिंदे हे एका कार्यक्रमासाठी सोलापुरात आले असता नगरसेवक चंदनशिवे यांनी त्यांची भेट घेतली. गुडेवार यांनी शहरात बेकायदा बांधकामांविरुदद्ध मोहीम हाती घेतली, अतिक्रमणे काढून रस्ते रूंद केले. संपूर्ण शहराला डिजिटल फलकमुक्त केले. राज्य व केंद्राच्या विविध विकास योजना आणल्या व विकासाभिमुख कारभार केला. स्वच्छ, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन चालविले. आणखी दोन वर्षे त्यांची सोलापूर महापालिकेत गरज असताना त्यांना अचानक परत पाठविण्यात आले. त्यामुळे सामान्य सोलापूरकर नाराज झाले असून बदली प्रकरणाचा दोष सत्ताधाऱ्यांना देत आहेत, याविषयी शिंदे यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी आणि खुलासा करावा, अशी मागणी चंदनशिवे यांनी केली. परंतु शिंदे यांनी याप्रकरणी थंडा प्रतिसाद दिल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sushilkumar shinde disclose transfer case of gudewar

ताज्या बातम्या