Sushma Andhare on Neelam Gorhe : नवी दिल्ली येथे ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेनेच्या (शिंदे) नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेवर (ठाकरे) मोठा आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्यावर एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेकडूनही (ठाकरे) यावर प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे यांनी गोऱ्हे यांचा चापलूस व गद्दार असा उल्लेख केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “नीलम गोऱ्हे ३० वर्षे ज्या पक्षात राहिल्या तिथे असं काही होत असेल तर नीलम गोऱ्हे यांनी एवढा पैसा कुठे ठेवला आहे? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण ‘मातोश्री’वर (शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) त्यांच्याइतकं दुसरा कोणताही माणूस वावरत नव्हता. त्या मातोश्रीवरच असायच्या. त्यांनी कुठे-कुठे संपत्ती घेतली? परदेशात किती पैसे गुंतवले? या प्रश्नांची उत्तरं नीलम गोऱ्हे यांनी द्यायला हवीत. त्यांनी शिवसेनेला (ठाकरे) प्रश्न विचारलेत मात्र, जाब हा बरोबरीच्या माणसाला द्यायचा असतो. अशा चापलुशा, बदमाशी करून व मर्जी मिळवून पद मिळवणाऱ्या लोकांना जाब विचारून अथवा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांची उंची वाढवायची नसते. नीलम गोऱ्हे चार वेळा आमदार असल्या काय किंवा विधानसभेवर असल्या काय, आमच्या नजरेत त्या बदमाश व गद्दारच आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या होत्या?

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं ही वस्तूस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोवर त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता. पण आमदारांना भेटी मिळणं बंद झालं”.