शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा जनसंवाद दौरा सध्या सुरु आहे. कसारा खर्डी येथील भागात त्यांनी पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधला. शहापूर या ठिकाणी त्या बोलत असताना तिथे एक वानर आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

सुषमा अंधारे माईकवरुन संवाद साधत असतात. त्या म्हणतात, “असा महाराष्ट्र नव्हता. काही लोक म्हणतात उद्धव ठाकरेंना पक्ष सांभळता आला नाही.” सुषमा अंधारेंनी हे वाक्य उच्चारलं की वानर त्यांच्या पुढ्यात उडी मारतं असं दिसतं आहे. मात्र सुषमा अंधारे या वानराला घाबरल्या नाहीत. त्या काहीशा मागे जातात, आणि म्हणतात, “हे सगळं घडलं कारण बाळासाहेब ठाकरे नव्हते म्हणून ही घटना घडली.” सुषमा अंधारे वाक्य बोलत असतानाच हे वानर त्यांच्यासमोर बसून असलेलं दिसतं आणि अचानक त्यांच्या पाठीमागे उडी मारतं. ज्यावर सुषमा अंधारे म्हणतात “हा फारच अवघड कार्यक्रम आहे.” पुढे सुषमा अंधारे म्हणतात, “जे लोक म्हणतात की बाळासाहेब असते तर पक्ष फुटला नसता त्या बदमाशांनी विचार करावा की बाळासाहेब हयात नाहीत म्हणून तुम्ही पक्ष हाती घेतला असं तुमचं म्हणणं असेल तर शरद पवार हयात असताना त्यांचा पक्ष कसा काय हिरावून घेतला?” असा प्रश्न सुषमा अंधारे विचारतात.

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
thane shivai nagar samaj bhavan marathi news
शिवाईनगर येथील समाजभवनावरून शिवसेना -भाजपत जुंपली

हे पण वाचा- सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध मालेगावात गुन्हा दाखल, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याची तक्रार

सुषमा अंधारेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली. सुषमा अंधारे यांचं भाषण सुरु असताना मध्येच एक अचानक वानर तिथे अवतरलं. काही वेळ ते वानर सुषमा अंधारे यांच्यासमोर येऊनच बसलं होतं. त्यांनी त्याला केळी खायला दिली. कसारा येथे आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, यांच्यावर जोरदार टीका केली.तर नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याबद्दल टील्ल्या-पिल्ल्या म्हणून उद्गार काढले.भाजपाकडे कोणीही नेता उरला नाही असं देखील खोचक वक्तव्य त्यांनी केलं. हे सगळं असलं तरीही त्यांच्या भाषणा दरम्यान उडी मारणाऱ्या वानराची चर्चाच आता रंगली आहे.