लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव : हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध येथील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ed Action Jharkhand
मंत्र्यांच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही चक्रावले!
young woman suicide koparkhairane, navi Mumbai rape marathi news
युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
pune, case registered, Former Minister Balasaheb Shivarkar, House Grabbing, dhananjay pingale, police, pune news, pune House Grabbing case, marathi news,
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगावातील अमन परदेशी यांनी या संदर्भात तक्रार दिली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंधारे यांनी हिंदू धर्मियांच्या देवतांबद्दल अनुचित शब्दप्रयोग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध पालकमंत्री दादा भुसे यांच्या तक्रारीनुसार मालेगाव न्यायालयात बदनामी प्रकरणी खटला दाखल आहे. आता अंधारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा-नाशिक : घरफोडीतील पैशांतून शेअर बाजारात गुंतवणूक; उच्चभ्रू वसाहतीत घर हेरणारी दुकली ताब्यात

या प्रकरणातील तक्रारदार परदेशी हा मालेगाव येथील युवक असून तो पुण्यात उच्च शिक्षण घेतो. डिसेंबरच्या अखेरीस तो मालेगाव तालुक्यातील चिखळओहोळ येथील मित्र किरण हिरे याच्याकडे आपल्या मित्रांसमवेत गेला होता. त्या ठिकाणी त्याला भ्रमणध्वनीवर एका युट्युब वाहिनीवर सुषमा अंधारे यांचे भाषण ऐकण्यास व बघण्यास मिळाले. त्या भाषणात अंधारे यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचे आढळले. या संदर्भात परदेशी यांनी मालेगाव येथील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. सुधीर अक्कर यांच्यामार्फत कायदेशीर सल्ला घेतला. त्यानुसार परदेशी यांनी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक व तालुका पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. सुषमा अंधारे यांनी जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी द्वेष बुध्दिने देवतांविषयी वेगळे शब्दप्रयोग केल्यामुळे मालेगाव शहरातील हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. सुषमा अंधारे यांची भाषणाची चित्रफित पुरावा म्हणून त्यांनी सादर केली. या तक्रारीवरून मालेगाव तालुका पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्याविरुध्द भारतीय दंड विधान कलम २९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.