महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच प्रचंड जीवितहानी झाली. दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं कामं काल सकाळपासून सुरू असून, अद्यापही अनेकांच्या आप्तस्वकीय बेपत्ता आहेत. काळीज पिळवटून टाकणारी घटना म्हणजे काळ बनून आलेल्या दरड दुर्घटनेनं अवघ्या १ वर्षाची सान्वी आणि ८ वर्षाच्या करणालाही सोडलं नाही. त्या दोघांच्या कुटुंबियांचा आक्रोश काळजाचं पाणीपाणी करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच प्रचंड जीवितहानी झाली. दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं कामं काल सकाळपासून सुरू असून, अद्यापही अनेकांच्या आप्तस्वकीय बेपत्ता आहेत. काळीज पिळवटून टाकणारी घटना म्हणजे काळ बनून आलेल्या दरड दुर्घटनेत अवघ्या १ वर्षाची सान्वी आणि ८ वर्षाच्या करण बळी ठरल्याची भीती आहे. त्यांच्या शोध घेतला जात असून, कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे.

अद्यापही ५२ लोकांचा शोध सुरू असून, युद्धपातळीवर कार्य केलं जात आहे. तळीये येथील दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी या आज (२४ जुलै) घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मीडियाशीही संवाद साधला. तळीयेच्या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेतील ५२ जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ३५ महिला, १० मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता आहेत, असं त्या म्हणाल्या.

दुर्घटनेत बेपत्ता असलेल्यांची नावं- यादी वाचण्यासाठी क्लिक करा

एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसंच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे, असं सांगतानाच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखाची तर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार जखमीवर मोफत उपचार केले जाणार आहेत, असं चौधरी यांनी सांगितलं.

वेळेवर मदत मिळाली असती तर…

अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वरंध घाट परिसरातील तळये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरं दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर दुसरीकडे पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणाच कोलमडलेली असल्यानं दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मदतकार्य सुरू झालं; पण तोपर्यंत अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. वेळेत मदत मिळाली असती, तर अनेकांचे जीव वाचवता आले असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliye landslide updates 52 people missing yet rescue operations continue bmh
First published on: 24-07-2021 at 13:44 IST